स्वाइन फ्लू (Swine Flu)

 


हा लेख स्वाइन इन्फ्लुएन्झा या रोगाबद्दल असून यास स्वाइन फ्लू असेही म्हटले जाते.

आजाराची कारणे

स्वाइन इन्फ्लूएन्झा किंवा स्वाइन फ्लू हा इन्फ्लुएन्झा ह्या रोगाचा एक प्रकार आहे जो सर्वसाधारणपणे डुक्कर या प्राण्यामध्ये आढळणाऱ्या विषाणूंमुळे होतो. सतत डुक्करांमध्ये वावरणाऱ्या माणसाला ह्या विषाणूची बाधा होऊ शकते. स्वाइन फ्लू हा एक संसर्गजन्य रोग आहे, जो एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे प्रसारित होऊ शकतो.

डुकराचे शिजवलेले मांस खाण्याचा या रोगाशी संबध नाही. त्या प्रमाणेच २००९ मधील स्वाइन इन्फ्लूएन्झाची साथ सुद्धा भारतातील डुकरांमूळे आलेली नसून अमेरिका खंडातील मेक्सिको देशातील डुकरांपासून सुरू झाली आहे.

संसर्ग

याचा संसर्ग डुक्कर या प्राण्याद्वारे तसेच माणसाद्वारे होतो.या विषाणूंचा प्रसार हा रोग्याच्या नाकातील व घशातील स्राव, त्याचा घाम वा त्याची थुंकी यांमधून होतो.

आजाराची लक्षणे

ताप येणे, खोकला येणे, घसा दुखणे, अतिसार, उलट्या होणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे ही या आजाराची काही लक्षणे आहेत. टॅमी फ्ल्यू हे औषध एच-१ एन-१ च्या विषाणूच्या संसर्गावर प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. या औषधाचा भारत सरकारकडे पुरेसा साठा आहे. तथापि, या औषधांचा वापर या विषाणूंचा संसर्ग झाल्याचे नक्की झाल्यावरच होणे आवश्यक आहे. या औषधास विषाणूंकडून प्रतिरोध निर्माण होऊ नये यासाठी शासन ही काळजी घेत आहे.

याशिवाय वैयक्तिक संरक्षक साधने (पीपीई), एन ९५, मास्क आणि सर्जिकल मास्क वगैरेंचा पुरेसा साठा केंद्र शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर तसेच बंदरांवर येणाऱ्या परदेशी प्रवाशांची तपासणी वैद्यकीय पथकांच्या साहाय्याने करण्यात येते. हा आजार महाराष्ट्रातही आला असून तो पुणे-मुंबई मध्ये आला आहे. नाशिक जिल्ह्यामधील चांदवड, निफाड व मनमाड येथेही या रोगाचे रुग्ण सापडले आहेत.

आजार कसा टाळावा ?

1. हात नेहमी साबण-पाण्याने धुवावेत.

2. गर्दीमध्ये जाण्याचे टाळावे.

3. स्वाईन फ्ल्यू रुग्णापासून किमान एक हात तरी दूर राहावे.

4. खोकताना- शिंकताना तोंडाला रुमाल लावावा.

5. भरपूर पाणी प्यावे व पुरेशी झोप घ्यावी.

6. पौष्टिक आहार घ्यावा.

7. हस्तांदोलन अथवा आलिंगन देण्याचे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळावे.

8. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे टाळावे.

9. आजारी असल्यास शक्य तितक्या कमी लोकांशी संपर्क ठेऊन घरीच विश्रांती घ्यावी.

10. आहारात पातळ पदार्थ मोठ्या प्रमाणात घ्यावेत. .

11.तोंडावर मास्क लावावा.

हा आजार प्राणघातक नाही. योग्य उपचारानंतर दहा दिवसांत रुग्ण बरा होऊ शकतो.

रोग निदान विषाणू तपासणी

याचे प्राथमिक निदान लक्षणांवर आधारित आहे. निदानासाठी रुग्णाच्या घशातील द्रव पदार्थाचा नमुना प्रयोगशाळेत पाठवावा लागतो.रुग्णाच्या विषाणू तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू संस्था (एनआयव्ही), पुणे व राष्ट्रीय संचारी रोग संस्था (“नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसिजेस’-एनआयसीडी), दिल्ली येथे प्रयोगशाळा तपासणीची व्यवस्था उपलब्ध आहे.

उपचार

कोणत्याही खासगी वैद्यकांना, खासगी डॉक्टरांना अथवा खासगी रुग्णालयांना स्वाइन फ्लूवर उपचार करण्याची देण्याची क्षमता नसून, परवानगीही नाही.या रोगाचे उपचार राज्य स्वाईन फ्ल्यू नियंत्रण कक्ष अथवा मान्यता प्राप्त शासकीय रुग्णालयातच उपलब्ध आहे आणि तसा तो शासकीय रुग्णालयातूनच घेणे बंधनकारक आहे.जर एखादी व्यक्ती या रोगाने आजारी असेल, विषाणू प्रतिबंधक औषधे त्याचे आजार काही प्रमाणात कमी करू शकतात व त्यामुळे रोग्यास लवकर बरे वाटू शकते. लवकरात लवकर (लक्षणे दिसून आल्यावर दोन दिवसात) उपचार सुरु केल्यास, औषधांचा खूप फायदा होतो. विषाणू प्रतिबंधक लस घेण्याखेरीज घरात अथवा इस्पितळात सहाय्यक देखभाल केल्यास ताप कमी होऊ शकतो तसेच यातना कमी होऊ शकतात. त्याप्रमाणेच, माध्यमिक संक्रमण व इतर आरोग्यविषयक समस्या ओळखू येतात.

प्रतिबंधक लस

या रोगाच्या विविध प्रकारांना प्रतिबंध करणाऱ्या विविध लसी उपलब्ध आहेत. १५ सप्टेंबर २००९ ला अमेरिकन एफडीए ने स्वाइन फ्ल्यूसाठी पहिली लस प्रामाणित केली. ती घेतली की १० दिवसांत शरीरामध्ये प्रतिबंधक रसायने तयार होतात. अध्ययनातून असे लक्षात आले की, या लसी परिणामकारक तसेच सुरक्षित ही आहेत.स्कॉटलंड मध्ये लस घेतलेल्या २,४८,००० लोकांचे सर्वेक्षण केल्यावर असे लक्षात आले की,(२५डिसेंबर२००९ पूर्वी) ९५% लोकांवर तिचा परिणाम झाला आहे.

हा लेख www.wikipedia.org येथून घेण्यात आला आहे.
स्वाइन फ्लू (Swine Flu) 4.5 5 MPSC Guidelines हा लेख स्वाइन इन्फ्लुएन्झा या रोगाबद्दल असून यास स्वाइन फ्लू असेही म्हटले जाते. आजाराची कारणे स्वाइन इन्फ्लूएन्झा किंवा स्वाइन ...


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा