अक्षवृत्त आणि रेखावृत्त

 


अक्षवृत्त

पृथ्वीवरील समान अक्षांश असणाऱ्या सर्व ठिकाणांना जोडणाऱ्या पूर्व-पश्चिम काल्पनिक रेषेस अक्षवृत्त असे म्हणतात. एखाद्या ठिकाणाचे त्याच्या अक्षवृत्तावरील स्थान त्याच्या रेखांशाने दर्शविले जाते.

अक्षवृत्तांच्या रेषा एकमेकांना समांतर असतात. जसजसे विषुवृत्तापासून उत्तर अथवा दक्षिण धृवाकडे जावे तशी अक्षवृत्ते लहान होत जातात. विषुववृत्त हे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे.

प्रमूख अक्षवृत्ते

आर्क्टिक वर्तुळ (Arctic circle) (66° 33′ 38″ N)
कर्कवृत्त (Tropic of Cancer) (23° 26′ 22″ N)
विषुववृत्त (Equator) (0° N)
मकरवृत्त (Tropic of Capricorn) (23° 26′ 22″ S)
अँटार्क्टिक वर्तुळ (Antarctic circle) (66° 33′ 38″ S)

रेखावृत्त

पृथ्वीच्या गोलावरील उत्तर व दक्षिण धृवांमधून जाणाऱ्या व विषुववृत्ताला काटकोनात छेदणाऱ्या काल्पनिक वर्तुळांना रेखावृत्ते म्हणतात. रेखावृत्तावरील प्रत्येक स्थानाचे रेखांश समान असतात. सर्व रेखावृत्ते एकमेकांना दोन व दोनच बिंदूंमध्ये छेदतात, हे बिंदू म्हणजे उत्तर व दक्षिण धृव होय.
सर्व रेखावृत्ते समान लांबीची असतात.

प्रमुख रेखावृत्ते

आंतरराष्ट्रीय वार रेषा (+180° पूर्व किंवा -180° पश्चिम)
ग्रिनीच मधून जाणारे मुख्य रेखावृत्त (00°)

Source:-Wikipedia
अक्षवृत्त आणि रेखावृत्त 4.5 5 MPSC Guidelines अक्षवृत्त पृथ्वीवरील समान अक्षांश असणाऱ्या सर्व ठिकाणांना जोडणाऱ्या पूर्व-पश्चिम काल्पनिक रेषेस अक्षवृत्त असे म्हणतात. एखाद्या ठिक...


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा